केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचा नवीन नियमावलीचा प्रस्ताव

0
137

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषकरून हा नियम नवीन नियमावलीचा प्रस्ताव पाठवला आहे.या नियमाप्रमाणे जर दुचाकीवर ९ महिन्यापासून ते ४ वेर्षापर्यंतचे मूळ बसलेअसेल तर त्या दुचाकींचा वेग हा ४० किमी असला पाहिजे.

त्याशिवाय बालकांना क्रॅश हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे. लहान मुलांना चालकासोबत चिटकून बसवण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा (एका प्रकारचे सुरक्षा कवच) वापर आवश्यक असेल. जेणेकरून अपघातात झटका बसून वा इतर कोणत्याही दुर्घटनेसारख्या स्थितीत मूल गाडीवरून पडणार नाही.

दुचाकी वाहनांवर चार वर्षांपर्यंतच्या मुलासोबत तिसरा प्रवासी सध्या बसू शकतो परंतु त्यापेक्षा जास्त वयाचा तिसरा बालप्रवासी असल्यास तो गुन्हा समजून दंड ठोठावण्यात येणार आहे. यदंडाची रक्कम नव्या मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांपर्यंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here