केरळमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट

0
111

केरळमध्ये सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटनां घडत आहेत. मुसळधार पावसाने मीनाचल आणि मणिमला येथील नद्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही धरणे पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचली आहेत.राज्यातील डोंगराळ भागातील अनेक लहान शहरे आणि गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. त्यामुळे केरळमध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी कोट्टायममध्ये 13 आणि इडुक्कीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

बचावकार्यासाठी सैन्य दलाचे एक पथक वायनाडला पोहोचले आहे. हेलिकॉप्टरच्या सहय्याने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.भारतीय हवामान विभागाने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागाने उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात अतिवृष्टीसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here