केरळ बनले मेडिकल ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक सरस राज्य

0
78

२०२० मध्ये महामारी सुरू झाली हाेती तेव्हाच केरळ राज्याने या रोगाच्या गंभीरतेच्या परिणामांवर विचार केला. या राज्याने मेटल्स अँड मिनरल्सने उद्याेगांतून निघणाऱ्या वायूंच्या टाकाऊ गॅसमधून ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सुरूवात केली हाेती. पेट्राेलियमसंबंधी पेसाे संस्थेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या आराेग्य विभागासाेबत मिळून पेसाेने मार्च २०२० पासून ऑक्सिजनशी संबंधित सर्व गाेष्टींवर निगराणी सुरू केली हाेती असे पेसाेचे उपमुख्य नियंत्रक आर. वेणुगाेपाल यांनी सांगितले.

राज्यात पूर्वी उद्याेगांसाठी ऑक्सिजनचे उत्पादन हाेते. दरराेज ६३ टन औद्योगिक ऑक्सिजन व नायट्राेजनच्या उत्पादनात ७ टन वेस्ट ऑक्सिजन निघते. म्हणून आम्ही वेस्ट ऑक्सिजनपासून मेडिकलसाठी ऑक्सिजनचे उत्पादन केले. ते सर्व मेडिकल उपयाेगासाठी वळवले. राज्यात ११ एअर सेपरेशन युनिट, २३ ऑक्सिजन फिलिंग प्लांट आहेत. केरळमध्ये एका दिवसात १९९ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन हाेऊ शकते. ३० एप्रिल पर्यंत राज्यात १०३.५१ मेट्रिक टनची गरज पडू शकते.

या प्रकल्पात ऑक्सिजन आणि नायट्राेजन वेगळे करतात. त्यामुळे केरळ मेडिकल ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक सरस राज्य ठरले आहे. गाेवा, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांना देखील येथूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसे तर केरळमध्ये काेराेना रुग्ण संख्या काही कमी नाही. परंतु यामुळे केरळात प्राणवायूचा तुटवडा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here