केवायसी’ अपडेटच्या बतावणी करत १ लाख ६४ हजार रुपयांवर ऑनलाईन डल्‍ला

0
83

रत्नागिरी – बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेटची बतावणी करत एकाची सुमारे १ लाख ६४ हजार ९९९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्‍याचे समोर आले आहे. या प्रकरणी शर्मा नावाच्या व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २५ जून रोजी घडली.
याबाबत कुलविंदर सिंग सिद्दू (वय 56,मूळ रा.पंजाब सध्या रा. कोस्टगार्ड विमानतळ एमआयडीसी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे याबद्दल तक्रार दिली. त्यानुसार, शर्माने शुक्रवारी सायंकाळी सिद्दू यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी केली. त्याने पाठवलेल्या लिंकवर सिद्दू यांनी क्लिक केले. त्यानंतर सिद्दू यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ६४ हजार ९९९ रुपये काढून त्‍यांची फसवणूक केली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here