गीतकार मनोज मुंतशीर यांच्यावर अक्षय कुमार स्टारर ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोज मुंतशीर यांनी ‘तेरी मिट्टी’ हे गाणे 2005 मध्ये आलेल्या एका पाकिस्तानी गाण्यातून चोरले असल्याचे म्हटले जात आहे. या आरोपांमुळे मनोज मुंतशीर भडकले आहेत. त्यावर त्यांनी जर ‘तेरी मिट्टी’ गाणे कुठून कॉपी केल्याचे सिद्ध झाले तर लिखाण कायमस्वरुपी सोडून देईन म्हटले असे आहे.
ज्या गाण्याविषयी बोलले जात आहे, ते पाकिस्तानी गायकाने नव्हे तर आपल्या लोकगायिका गीता रबारीने गायले आहे. तुम्ही त्यांना देखील कॉल करुन याची खातरजमा करुन घेऊ शकता.यूट्यूब व्हिडिओ ‘केसरी’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी अपलोड करण्यात आला आहे.
‘मेरी फितरत है मस्ताना’ या पुस्तकामुळे गीतकार मनोज मुंतशीर वादात अडकले होते. या पुस्तकातील कविता ‘मुझे कॉल करना’ ही रॉबर्ट जे लेवरी यांच्या 2007 मध्ये आलेल्या ‘कॉल मी’ची कॉपी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.