कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा १००% निकाल;वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष व अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
मंदार चोरगे / वैभववाडी
एच.एस.सी.परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून एकुण २४८ विद्यार्थी एच एस सी परिक्षेत प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कला शाखेतून कु.अनुजा वामन इंदप या विद्यार्थीनीने ८२.८३ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर कु.विशाल संभाजी कांबळे याने ८१.३३ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु. भावेश विकास खेडेकर याने ७९.५०% गुण मिळवत कला शाखेतून तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेतून कु.अंकीता रमेश मुळये हिने ९४.८३% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.अभय गजानन तोरस्कर याने ९२.६६% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.सानिका विश्वनाथ पांचाळ हिने ९१% गुण मिळवत वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक पटकावला.
विज्ञान शाखेत कु.विनिता मोहन राणे या विद्यार्थीनीने ९७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.दिपक संतोष मांजरेकर याने ९०.१६% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला व कु.योगेश्री सुनिल केळकर या विद्यार्थीनीने ८६.५० % गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.