पुणे – कोकण,रायगड,मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात या जिल्ह्यात चार दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कोकण आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात ढग दाटले असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत.
केरळात मान्सून उशीरा दाखल होणार आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही दोन दिवस उशीरा मान्सूनचं आगमन होत आहे. कोकणात मान्सून १० जूनला तर मुंबईत १२ जून पर्यंत पोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.