कोकण, मुंबई परिसरात जोरदार पाऊस

0
106

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीपासून सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. ल्याने सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड मुंबई पालिका, ठाणे, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी नियंत्रण कक्षाद्वारे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here