रोनाल्डोने युरो चषक फुटबॉल सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत कोका-कोलाच्या दोन बाटल्या दूर केल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. त्याच्या या कृतीमुळे कोका-कोलाला चार अब्ज डॉलरचा फटका बसला. तंदुरुस्तीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या रोनाल्डोने पत्रकार परिषदेत त्याच्या समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या
रोनाल्डोने असे केल्यामुळे युरो-2020 च्या अधिकृत पुरस्कर्त्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाला तब्बल 29 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कोको-कोला 1974 पासून फीफाची प्रायोजक कंपनी आहे आहे. तरीही रोनाल्डोने धाडस दाखवले आहे.भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मी स्वत: जे सॉफ्ट ड्रिंक पीत नाही, ते फक्त काही पैशांसाठी मी इतरांना ते पिण्यास सांगू शकत नाही.असे म्हणत पेप्सीबरोबरचा करार रिन्यू करण्यास त्याने नकार दिला. आमिर खानही सध्या कोणत्याही कोला ब्रँडची जाहिरात करत नाही.
सनी लिओनी ‘महक’ पान मसाल्याच्या ब्रँडला जाहिरात करायची. पाच वर्षांपूर्वी पान मसाला आरोग्यासाठी चांगला नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर सनीने पान मसाल्याची जाहिरात करणार नसल्याची घोषणा केली होती.आता फेअरनेस क्रिमविरूद्ध वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे आता स्टार्स फेअरनेस क्रिमच्या जाहिराती टाळू लागले आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारात आता प्रो-मार्केट नव्हे तर प्रो- कंज्युमर ट्रेंड सुरु आहे. बर्याच सेलेब्रिटींनी यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांसाठी चांगले नाही, ते सोडून द्यायला हवे आणि त्याचे समर्थन करु नये. त्यांना ब्रँडच्या नव्हे तर आपल्या चाहत्यांच्या हिताचा विचार करु लागले आहेत. कोला जाहिरातींसाठीचे बजेट 40 लाख ते 12 कोटी रुपयांपर्यंत असते.