कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १५ मे २०२१ च्या सकाळी ७ पासून १ जून २०२१ च्या सकाळी ७ पर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे शासनाचे आदेश जारी केले आहेत.१ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणा-यांसाठी आधीचे नियम लागू असतील.
औषधे आणि कोरोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणा-या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचा-यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असे सागंण्यात आले आहे.वाहतुकीसाठी चालक, क्लिनर दोघांनाच परवानगी असणार आहे. जर ही वाहतुक बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून, ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.
स्थानिक बाजारपेठा तसेच, एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून कोरोनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणे शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. बाहेरुन राज्यात येणा-या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणा-या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असे बंधनकारक असून प्रवेश करण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असे आदेशात नमूद आहे.
See Translation47People Reached4EngagementsBoost Post
221 ShareLikeCommentShare