कोरोनाची तिसरी लाट थांबवण्यासाठी आपले एन्जॉयमेंट थांबवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
95
H3N2 विषाणू
H3N2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य तिसर्‍या लाटेवर चिंता व्यक्त केली. हिल स्टेशन, मार्केटमध्ये विना मास्क आणि कोरोना नियमांचे पालन न करता गर्दी होणे ठीक नसल्याचे ते म्हणाले. ही बाब आपल्यासाठी चिंतेची असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी आम्ही आंनद घेऊ इच्छीतो. परंतु, मला त्यांना सांगायचे की, कोरोना काही आपोआप येत नाही. याला रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायले हवे. कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर आपल्याला कोरोना नियमांचे पालन, मास्क, सोशल डिस्टेंसिंगचा पालन करावा लागेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

डेल्टा व्हेरिएंट धोकादायक आहे यावर तज्ञ लोकांचा अभ्यास सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंध आणि उपचार हे अधिक महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवा असेही मोदी यांनी सांगितले आहे.आपण गेल्या दीड वर्षापासून या महामारीशी लढत आहोत त्यामुळे आपल्या अनुभवाचा वापर करत ही लाट थांबवावी लागेल असेही पंतप्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here