कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी-मार्चमध्ये येण्याची शक्यता तज्ञांचा इशारा

0
155

देशभरात कोरोनाची दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी नवीन रुग्ण आढळून येतच आहेत.प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोनाचे निर्बंधी कमी करण्यात आले आहेत. भारतात लसीकाण जोरात सुरु आहे.अधिकाधिक नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे.पण कालच तज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये म्हणजेच २०२२ ला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र या तिसच्या लाटेची तीव्रता जास्त असणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.लसीकरण हा कोरोना साथ रोखण्याचा एकमेव मार्ग पर्याय असल्याचे मतअनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.लसीकरणामुळे विषाणूविरोधात नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्यामुळे वातावरणातील विषाणू स्वतःमध्ये बदल करुन आणखी शक्तीशाली होतो.


रशिया, जर्मनी, चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. कोरोनाचा विषाणू जोपर्यंत वातावरणात आहे तोपर्यंत धोका कायम आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत.चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळं हाहाकार माजला आहे. चीनमधील दलियान प्रांतातील झुंगाझे विद्यापीठामध्ये कोरोना संसर्ग हाताबाहेर गेल्याची माहिती आहे. त्यामुळं तेथील जवळपास 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.


कोरोनाच्या दोन्ही लाटेत जगभरात अनेकांनी आपले जवळचे,नातेवाईक गमावले आहेत तर अनेकांनी आपला रोजगार गमावाला आहे. अनेकांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला आहे. दिवाळीनंतर जरा मार्केटमध्येही हालचाल सुरु झाली आहे आणि आर्थिक चक्र सुधारते आहे असे असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध पाळावेत आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेची दाहकता कमी करावी अशी अपेक्षा आहे. लाट फारशी तीव्र नसेल असे देखील तज्ज्ञांनी म्हटले आहे.विषाणूचा प्रभाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात. त्यामुळे पुढच्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याने या लाटेची तीव्रता कमी असेल असेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here