कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता आत थोडी कमी होत आहे.पण त्यापूर्वीच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना तिचा लहान मुलांना संसर्ग होणार आहे असे विधान एम्स कडून केले गेले.त्यांनतर प्रत्येक राज्याने आपल्या राज्यात विविध सोयी करून रुग्णालये सज्ज केली. महाराष्ट्र राज्यानेही बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स बनून राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोणती काळजी घ्यावी आणि मुलांना कशा पद्धतीने औषधोपचार द्यावा हेही सांगितले.
आता सोमवारी आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग फारच कमी दिसून आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग दिसून येईल असे वाटत नाही असे सांगितले.तसेच लोकांनी घाबरू नये असेही सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारतात जवळजवळ ३-४ महिने कोरोनाचे रुग्ण आढळून येत नव्हते.पण त्यांनतर मात्र कोरोनाने प्रत्येक घरातील एक माणूस हिरावून नेला हे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येकाने इथून पुढे काळजी घेणे आणि जबाबदारीने स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे ,लहान मुलांचे रक्षण करावे.कोरोना आजार का ,कशामुळे आणि कधी आपल्या घरात येईल आणि त्यातून काय होईल हे आणि काय नाही हे कुणीच सांगू शकत नाही हे वास्तव आहे. कोरोनामध्ये कोणते उपचार करावे याबद्दल कोणत्याही डॉक्टरचे एकमत नाही. प्रत्येकजण विदेशात काय करतात यावर भारतातील रुग्णांना काय उपचार द्यावे हे ठरवितात. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य, आपली प्रतिकारशक्ती वाढविणे आणि कोरोनाच्या रोगाला बळी न पडणे यासाठी वारंवार हात धुणे,गर्दी टाळणे,डबल मास्कचा अवलंब करणे या गोष्टीं कटाक्षाने पाळाव्यात.