कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर ; केरळ राज्यात १८०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

0
67
कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर ; केरळ राज्यात १८०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

केरळ- कोरोना महामारीच्या दहशतीमध्येच बर्ड फ्लूमुळे आता लोकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे १८०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील सरकारी पोल्ट्री सेंटरमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे १८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरकारी कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या व्हायरसचा H5N1 प्रकार आढळून आला आहे. हे केंद्र जिल्हा पंचायतीमार्फत चालवले जाते. अधिकाऱ्याने सांगितले की, केरळच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत नियमांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here