कोरोनाच्या संकट काळात जीवाची बाजी लावून रूग्णसेवा देणारी आंदुर्ले गावची सुकन्या सिध्दीका भोवर !

0
84

सिंधुदुर्ग – अभिमन्यू वेंगुर्लेकर

आंदुर्ले गावची सुकन्या सिध्दीका भोवरने कोरोनाच्या संकट काळात जीवाची बाजी लावून रूग्णसेवा देण्याचे धाडस हे आंदुर्ले वासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. रेड झोन मध्ये गेलेल्या सिंधुदुर्गाला कोरोनाच्या वेढ्यातून मुक्त करण्यासाठी सिंधुदुर्गातील तीन नर्सिंग स्कूलनि पुढाकारघेतला आहे. या नर्सिंग स्कूलमधील 80 विद्यार्थी एकही रुपयांचा मोबदला न घेता जिल्ह्यात सेवा बजावत आहेत. सिंधुदुर्गाच्या दृष्टीने ही फार मोठी अभिमानास्पद असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे सरसावलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराव तेवढं थोडच आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाच्या ए. एन. एम. विभागाचे अठरा विद्यार्थी तर जी. एन. एम. विभागाचे 20 विद्यार्थीचा सहभागी झाले आहेत. यात आंदुर्ले गावची सुकन्या सिद्धिका देविदास भोवरचाही यात समावेश आहे . प्रशिक्षणार्थी असूनही कोवळ्या वयात आपल्या जिल्हाला कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सिद्धीचे हे धाडस म्हणजे आंदुर्लेवासीयांसाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.

आंदुर्ले गावाची सुकन्या सिद्धिका हिने बारावीत 80 टक्के मार्क मिळून जिल्हा रुग्णालय व शासकीय परिचर्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. सिद्धीच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच असून तिचे वडील श्री देविदास भोवर हे गोवा येथील हाउसिंग सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करतात.तसेच हाउसिंग सोसायटी मधील गाड्या धुण्याचेही काम करतात. सिद्धीची आई निर्मला देविदास भोवर या गृहिणी असून घरकाम करतात. अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या घराच्या छपराचे काम लांबणीवर टाकून हे दाम्पत्य आपल्या दोन्ही मुलीची शिक्षण थांबू नये या साठी कष्ट उपसत आहेत आणि त्यांच्या या कष्टाच सोनं या सिद्धिकाने केल आहे या जाणिवेने त्यांना समाधान वाटत आहे.एखाद्या मुलालाही लाजवेल असे काम साधिका करत आहे आणि याचा मला अभिमान आहे असे तिच्या वडिलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here