कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबांना आधार देणारी स्माईल योजना

0
67


सिंधुदुर्ग – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कोविड 19 महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी स्माईल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सिंधुदुर्गचे जिल्हा व्यवस्थापक एस.आर.म्हसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे, सदर योजनेची माहिती आणि अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. पात्रता – अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा ( कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी, मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीकरिता पुढील पैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहेत. महानगर पालिका, नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र( मृत्यू दि. 15 जून 2021 पर्यंत), स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. आवश्यक कागदपत्रे – मयत व्यक्तीचे नाव, पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला ( 3 लाखांपर्यंत) कोविड – 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा कोविड -19 मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने ही माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms,gle/7mG8CMeeLknWGt6K7 या लिंकवर दि. 30 जून 2021 पर्यंत भरावीको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here