कोरोनामुळे जगात सात देशांमध्येच लाखाच्या वर मृत्यू

0
78

कोरोनामुळे भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडण्यात थोडेफार यश मिळाले आहे. सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. कोरोनामुळे अमेरिकेत 6,12,203  मृत्यू झाले आहे.महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे. फ्रान्समध्ये 1.09 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या यादीत रशिया (1,23,436 मृत्यू), इटली (1,26,472 मृत्यू), यूके (1,27,836 मृत्यू), भारत (3,46,784  मृत्यू), ब्राझील (4,72,629 मृत्यू) आणि सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत (6,12,203  मृत्यू) झाले आहेत.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलें आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलिस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

राज्यात आज 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14 हजार 433 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,43,267 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.05 टक्के झाला आहे. आज 233 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,85,527 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 13,46,389 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here