कोरोनाचा संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन सक्रीय वाढत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही आहेत. देशात यावरुन सगळीकडे गोंधळ आणि तणाव दिसून येत आहे. शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी तातडीने दोन दिवसाचे संसदेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. देशात सध्याच्या अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदीय अधिवेशनेच आयोजन करण्यास सांगितले आहे.