मंदार चोरगे /वैभववाडी
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. अखेर गेल्या दोन- तिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुन्हा शेतीच्या कामांना वेग आला आहे.
वैभववाडी तालुक्यातील मौजे घानेगडवाडी येथे बाबू शामु खरात, शशिकांत श्रीधर रावराणे व योगिता वासुदेव भोगले यांच्या शेतात “श्री” पद्धतीत भात लागवड व “युरिया ब्रिकेट्स” चा नियंत्रित वापर याविषयी वैभववाडी कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले. कोरोना काळात देखील कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेला पहावयास मिळत आहे. यावेळी कृषि पर्यवेक्षक पाटील ए.आर. व कृषी सहाय्यक गव्हाणे एस. पी. यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले.