कोरोना: केरळमध्ये नवीन संक्रमितांमध्ये वाढ

0
102

देशात कोरोना 41 हजार 786 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 39 हजार 304 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यात 542 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या आता 4 लाख 4 हजार 804 एवढी आहे. देशात आतापर्यंत 3.16 कोटी लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. तर 3.08 कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. देशात आतापर्यंत 4.24 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केरळ राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांत सतत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 5 दिवसात 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. शनिवारी राज्यात 20 हजार 624 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली. तर 80 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 64 हजार 500 वर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here