कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे गोवा सरकारने राज्यातील कर्फ्यू येत्या ७ जूनपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. कर्फ्यूची मुदत उद्या ३० रोजी संपणार होती पण त्याआधीच गोवा सरकारने कर्फ्यू ७ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला
राज्यातील कोविड रुग्ण संख्या कमी होत असली तरी कोरोनमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखीन कमी व्हावा यासाठी सरकारने राज्यातील टाळेबंदी आणखी सात दिवसांसाठी वाढवली आहे.
या टाळेबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी काळजी करू नये .तसेच कर्फ्यूच्या उर्वरित नियम हे पूर्वीप्रमाणेच असतील असेही सांगीतले आहे. राज्यातील केसिनो, मद्यालये, रेस्टॉरंट, मासळी बाजार हे सगळे बंद रहाणार आहे.