कोरोना: देशात 24 तासात आढळून आले 42530 रुग्ण

0
99

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी कोरोनाचे 42,530 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी 30,029 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 36,552 संक्रमित लोकांनी या रोगाचा पराभव केला, तर 561 जणांचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाच्या 4.04 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

केरळमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण वाढत आहे त. मंगळवारी केरळमध्ये 23,676 नवीन प्रकरणे आढळून आली. सोमवारी हा आकडा 13,984 होता. राज्यातील सक्रिय प्रकरणांमध्ये 9,959 ची मोठी वाढ झाली आहे. आता येथे 1.73 लोकांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here