कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊनही खासदार डॉ. कोल्हे यांना कोरोनाचा संसर्ग

0
100

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe Covid 19 Positive) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, डॉ.अमोल कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे (Covid Vaccine) दोन्ही डोस घेतले आहे. खासदार डॉ. कोल्हे यांनी स्वत: ट्वीट करून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. तसेट संपर्कात आलेल्या नागरिकांनी देखील कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. खासदार अमोल कोल्हे यांना आता किमान 14 दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणं दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे, की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केलं आ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here