डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या 2 डीजी या कोरोना प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया या विभागाने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या संशोधकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधाची चाचणी सुरु केली होती.चाचणीत हे औषध कोरोनाला रोखण्यास यशस्वी असल्याचे दिसून आले.
याच आधारावर डीसीजीआयने मे 2020 मध्ये या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी दिली होती. आता हेच औषध क्लिनिकल ट्रायलमध्येही यशस्वी झाले असून डीसीजीआयने कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून याच्या आपत्कालीन वापरला मंजुरी दिली आहे.