कोरोना महामारीसाठी अमेरिकेतील सीडीसीने काही मार्गदर्शक सुचना जारी

0
95

कोरोना महामारीची जगभरात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. भारतात तर कोरोनाचा हौदोस घातला आहे. जगभरात या महामारीला रोखण्याचे अनेक प्रयत्न ,उपाययोजना राबवलय जात आहेत. भारतातील परिस्थिती पाहता जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहे.

अमेरिकेतील सीडीसीने काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यानुसार, कोरोना महामारीला रोखण्यासाठी मास्क हे सर्वात महत्वाचे उपाय असल्याचे सांगितले आहे.

सीडीसीच्या नवीन मार्गदर्शक सुचना – १) कोरोनापासून बचाव करण्यासाठी चेहरा, हनुवटी आणि नाक झाकणारा घट्ट आणि आरामदायक मास्क सर्वात सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच एका बाजूला हवेच्या निर्गमनासाठी खिडकी व झाकण असलेल्या मास्क पासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

सर्वात चांगला कोणता मास्क आहे ?सीडीसीच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘स्नॅग फिट मास्क‘ अधिक चांगला आहे. या काळात असे मास्क वापरा ज्‍यामुळे नाक, हनुवटी आणि चेहरा एकाचवेळी संपूर्ण झाकले जाऊ शकते.

आपला मास्क व्यवस्थित आहे का? जर आपल्याला श्वासोच्छ्वास घेताना आपला मास्क मागे व पुढे सरकत असेल किंवा त्यामधून गरम हवा येत असेल तर तो योग्य आहे असे समजावे. डिस्पोजेबल किंवा कपड्याचा मास्कचा वापर करत असल्यास त्यातील वायर (मेटल स्ट्रिप) नक्की पहा.

सीडीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, आपण कोणत्या मास्कपासून सावध रहावे

आपण एक्सहेलेशन वॉल्व्ह आणि व्हेंट मास्कपासून सावध राहायला हवे कारण यामुळे संक्रमण एका व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचते.मास्क वापरताना आपल्याला श्वास घ्यायलाही त्रास होता नये.

डबल मास्क घालने जरुरी आहे का?जर आपण डबल मास्क घालत असल्यास ते जास्त सुरक्षित असल्याचे सीडीसीचे म्हणणे आहे. परंतु, पर्यावरणाच्या दृष्टीने डिस्पोजेबल मास्कचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here