कोरोना रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांचे दर

0
87

शासकीय दरानुसार एखादा रुग्ण जनरल वॉर्डमध्ये विलगीकरणात असेल तर त्यासाठी ४ हजार रुपये दर आहे. व्हेंटिलेटर शिवाय रुग्ण अतिदक्षता विभागात विलगीकरणात असेल तर त्यासाठी ७ हजार ५००रुपये तर व्हेंटिलेटरसह उपचार सुरु असतील तर त्यासाठी ९ हजार रुपये शासकीय दर निश्चित करण्यात आलेला आहे. एक दिवसाच्या आकारण्यात आलेल्या दरामध्ये रुग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, २ डी इको, एक्स-रे, ईसीजी व ऑक्सिजन चार्ज, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर तपासणी, बेड चार्जेस, जेवण, नाकातून नळी टाकण्यासारखे छोटे उपचार यांचा समावेश आहे.

याशिवाय पीपीई किट, सेंट्रल लाईन टाकणे, केमोपोर्ट टाकणे, श्वसन नलिका व अन्य नलिकात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,कुठल्याही अवयवाचा तुकडा तपासणीसाठी पाठवणे, छातीतील व पोटातील पाणी काढणे, सिटीस्कॅन सारख्या तपासण्या यासाठी स्वतंत्र दर आकारण्यात येतो. एक दिवसाच्या शुल्कामध्ये या तपासण्यांच्या शुल्काचा समावेश असत नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here