कोरोना विषाणूमध्ये बदल; पोटरी, पाठदुखी, डायरिया कोरोनाची नवी लक्षणे

0
117

कोरोना विषाणूत बदल होत आहे. त्यामुळे कोविडची विविध लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे कोरोना होऊन उपचार करण्यापेक्षा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याचा सल्ला रविवारी ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत तज्ज्ञांनी दिला.कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आयोजित केलेल्या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने उद्घाटन झाले. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवली.डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे, अशी माहिती हार्वर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ मेहुल मेहता यांनी दिली.

सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करत आहेत. विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे. कोविडची विविध लक्षणे आढळत असून काही रुग्णांना चव आणि वास येत नाही. पोटरीचे स्नायू आणि पाठदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याची लक्षणे दिसत आहेत. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारावा असा सल्ला कोरोना कृती दलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी दिला.कोरोना संपला असे वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत.

रोज मास्क बदला, ओला झालेला मास्क कधीही लावू नका. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी झाल्यास पोटावर झोपा, त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. नव्या लक्षणांवर लक्ष ठेवा. लक्षणे दिसताच तत्काळ चाचण्या करून घ्या, असा सल्ला डाॅ. राहुल पंडित यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here