कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या शोधार्थ अमेरिकेने दिला ९० दिवसाचा अल्टिमेटम !

0
85

साऱ्या जगाला वेठीस धरलेला कोरोना व्हायरस हा कधी , कुठून आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ शोधात आहेत.यामध्ये दोन प्रकारचे तथ्य आजपर्यंत समोर आले आहे ,यातील पाहिले मत कोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसापर्यंत आला आहे तर दुसरे मत चीनच्या अहं येथील लॅबमधून बाहेर पडल्यामुळे कोरोना व्हायरस सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.

चीनच्या वुहान शहरामध्ये वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी नावाची एक रिसर्च लॅब आहे. या लॅबमध्ये वातावरणात आढळणारे आणि माणसांसाठी धोकादायक असलेल्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसवर अभ्यास केला जातो. 2002 मध्ये चीनमध्ये आढळलेल्या SARS-CoV-1 व्हायरसने जगभरातील 774 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या लॅबमध्ये वटवाघुळातून माणसांमध्ये होणाऱ्या संक्रमणावर अभ्यास झाला. याच लॅबमध्ये झालेल्या अभ्यासात दक्षिण-पश्चिम चीनमधील वटवाघुळांच्या गुफेत SARS सारखे व्हायरस आढळले होते.या लॅबच्या सभोवती अतिशय कडक सुरक्षितता पाळली जाते.

वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये जंगली जनावरांच्या शरीरातून जेनेटिक मटेरियल घेऊन त्यावर प्रयोग केले जातात. तसेच जिवंत पंडित किंवा इतर प्राण्यामध्ये हे व्हायरस सोडून त्याचे या प्राण्यांवर काय परिणाम होतात हेही पहिले जाते. या लॅबमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ज्ञांना कडक नियमांचे पालन करावे लागते.

असे प्रयोग करत असतानाच आय वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या लॅबमधील तीन शास्त्रज्ज्ञांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. तेव्हा चीनने जगाला कोरोना महामारीबद्दल सांगितले नाही. त्या घटनेच्या एका महिन्यानंतर म्हणजेच, डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाची माहिती जगाला दिली.त्यामुळे काही शास्त्रज्ज्ञांचे असे मत आहे की, लॅबमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा तयार केलेला व्हायरस लॅबबाहेर आला, या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वुहानची ही लॅब हुनान सीफूड मार्केटपासून काही अंतरावरच आहे. याच मार्केटमध्ये सर्वात आधी कोरोना व्हायरस आढळला होता.

चीन सरकारने लॅबमधून व्हायरस लीक झाल्याचे खंडन केले असून, याचा तपास करण्यासही नकार दिला आहे. यामुळे चीन मधील प्रयोगशाळेतच हा व्हायरस तयार झाला असल्याच्या शंकेला बळ मिळत आहे. पण, वुहानच्या लॅबमॅध्ये काम करणारे शास्त्रज्ज्ञ सांगतात की, SARS-CoV-2 बाबत त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही आणि यासंबंधी कुठलाच रिसर्च कधीच लॅबमध्ये झाला नाही. 24 शास्त्रज्ज्ञांनी एक पत्र लिहून WHO ला याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये वुहानमध्ये गेलेल्या WHO च्या टीमचे मिशन अपयशी ठरले होते.

WHO ची टीम वुहानमध्ये गेली होती. एप्रिलमध्ये या टीमने आपली रिपोर्ट सादर केली, पण यात काहीच निष्पन्न झाले नाही. यात कोरोनाच्या उत्पत्तीबाबतही काही सांगण्यात आले नाही. मागील दोन वर्षांमध्ये जे लोकांना सांगण्यात आले, त्याच गोष्टी या रिपोर्टमध्ये लिहील्या होत्या. यात व्हायरस प्राण्यांमधून आल्याचे म्हटले गेले. या रिपोर्टनंतर चीनच्या दबावात ही रिपोर्ट तयार करण्यात आल्याचा आरोपली लागला.

WHO ची टीमही वुहानमध्ये गेली होती. या टीममध्ये ऑस्ट्रेलिया ,अमेरिका यांचे शास्त्रज्ञही होते .पण पहिल्यांदा कोरोनाचा संसर्गाचे कारण सांगत त्यांना विलगीकरणाचे आदेश दिले होते. एप्रिलमध्ये या टीमने आपली रिपोर्ट सादर केली, पण यात काहीच निष्पन्न झाले नाही. यात कोरोनाच्या उत्पत्ती प्राण्यांमधून आल्याचे म्हटले होते.त्यानंतर चीनच्या दबावात हा रिपोर्ट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेचे २०१९ चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा हा व्हायरस चीनमधून आल्याचे म्हटले होते आणि बऱ्याच वेळा सभांमधून त्यांनी चीन व्हायरस असेच म्हंटले आहे. आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत 90 दिवसात पुरावा शोधण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here