गोव्यामध्ये कोरोनाचे १,६४७ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २,६९३ रुग्ण बरे झाले आहेत.आणि गेल्या २४ तासात ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोव्यामध्ये एकूण कोरोना संक्रमित रुग्ण १८,२४३ झाले आहेत.
गोवा मेडिकल कॉलेजचे संक्रमित रोगांचे प्रतिबंध या विभागाचे प्रमुख अधिष्ठाता डॉ.काकोडकर यांनी कोरोनाचे संक्रमण गोव्याच्या खेड्या-पाड्यात पसरले असल्याची माहिती दिली. एकूण २०६ कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट आहेत असेही ते म्हणाले.गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळ-जवळ ५०० रुग्ण येत असल्याचीही माहिती दिली.
गोव्यामध्ये कोरोनाचे संक्रमण पसरले आहे .कोरोनाचे नियम पाळण्यापेक्षाही आम्ही लोकांना त्याची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करत आहोत. गेल्या २४ तासात मृतांमध्ये १९ मृत्यू हे गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात झाले असून, १५ रुग्णांचे मृत्यू हे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये झाले आहेत.आणि ३ रुग्णांचा मृत्यू हा साऊथ गोव्यातील खासगी रुग्णालयात झाला आहे.यातील २ रुग्णांनी कोविडच्या लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता तर एकाने लसीचे दोन्ही डोस घेतले होते असेही ते म्हणाले .