कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सवही साध्य़ा पद्धतीनेच साजरा करावा

0
122

मुंबई महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाचं सावट लक्षात घेता नवरात्रोत्सवावरही टांगती तलवार होती. महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यंदा नवरात्रोत्सवही साध्य़ा पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे.

– सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिकेचे परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार केली आहे. यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.

– कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि महापालिकेचे संबंधीचे घोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावे. घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणा-या देवीमूर्तीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

– देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तीकरिता 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. 

  • – प्रसाद वाटणे, फुले अर्पण करणे टाळावे
    – आगमन-विसर्जनाला दहापेक्षा जास्त जण नसावेत
    – मंडप आवारात हार, फुले, प्रसाद विक्री स्टॉल नको
    – मंडपात एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त गर्दी नको
    – विसर्जनस्थळी मूर्ती विभाग कार्यालयाकडे जमा कराव्यात
    – कंटेंमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये

– यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, जेणेकरून आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविंड १९ साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.

– घरगुती देवीमुर्तींचे आगमन / विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क आणि स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. शक्यतो या व्यक्तींनी लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here