कोल्हापूर:आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली, जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असल्याचे सांगून बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगिकरण करण्यावर भर द्या. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात 15 दिवस निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या व अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली .