कोविडची तिसरी लाट आली तरी ऑक्सिनज कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

0
70

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.सध्या राज्यात लॉकडाऊन सदृश स्थिती आहे. कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का ? असे विचारले आहे. मला वाटतं तशी गरज वाटत असली तरी निर्बंध लादले जाणार नाही.

माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील. रुग्णवाढ कमी झालीय असे नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे. बंधने लावणे सोपे आहे, पण पाळणे अवघड आहे. मी गेल्यावेळी म्हटलं होतं, आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही.आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले. त्या दिवशी मलाही सांगायला जड गेले होते, पण त्याची गरज होती. तुम्हीही माझे नेहमी प्रमाणे ऐकले. जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे. मी जे बोललो ते आपण ऐकलं, निर्बंध घालणे अवघड होते. पण जी शक्यता होती. ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे.

राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही.गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची निर्मिती करण्याचे सांगितले आहे. मात्र, नव्याने प्लांट सुर करायचे असेल तर त्याला काही वेळ लागतोच. 15 ते 20 दिवस लागतील. कोविडची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही. तशी तयारी आपण केली आहे. मला खात्री आहे तशी वेळ येणार नाही. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते. मात्र,गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे. त्यामुळे गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोविड सेंटर्स उभारणार आहोत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं तज्ञ सांगत आहेत. पण, तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारने कंबर कसलीये. उद्योजकांना तिसऱ्या लाटेच्या तयारी करायला सांगितले आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती? नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात. नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली. पावसाळा सुरु होणार आहे. कुठे पुर येईल, पाणी घुसेल. विजा कडाडणार. त्यामुळे मी ऑडिट करण्याचे सांगितले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here