कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत-केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

0
93

केंद्र सरकारने सुप्रीम काेर्टात बुधवारी कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम देण्यात येईल असे सांगितले आहे.ही भरपाई आताच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी नसून या महामारीमुळे भविष्यातही ज्यांचा मृत्यू होईल, त्यांच्या नातेवाइकांना ही रक्कम भरपाई म्हणून दिली जाणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे .

सुप्रीम काेर्टाच्या निर्देशांनुसार एनडीएमएने अशा भरपाईबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली अाहेत. कोरोनाचा देशात संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३.९८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या सर्वांच्या नातेवाइकांना ही ५० हजारांची रक्कम दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना सरकारने  ४ लाखांपर्यंतची मदत करावी,अशा याचिका सुप्रीम काेर्टात दाखल झाल्या होत्या.

सुप्रीम काेर्टाने महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भरपाई म्हणून ठराविक रक्कम देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रक्कम किती असावी, हे ठरवण्याचे अधिकार सरकारला दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here