कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाल्यास बालकांसाठी हेल्पलाईन

0
97

मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे . कोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायपणाचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होणार आहे . अशा घटनांना रोखण्यासाठी १०९८ किंवा ८३२९०४१५३१ या हेल्पलाईनवर माहिती द्यावी- महिला व बालविकास विभागाचे आवाहन केले आहे .

अनाथ बालकांना संकट काळात मदत मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेनच्या (इंडिया) संयुक्त विद्यमाने विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे . सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ८३०८९९२२२२ आणि ७४०००१५५१८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे .

कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे . दत्तक विधान प्रक्रियेची माहिती http://cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here