कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकारी भरतीत प्राधान्य

0
90

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वचजण धडपडत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी रविवारी उच्च स्तरिय बैठक बोलावली होती. या मीटिंगमध्ये देशातील ऑक्सीजन आणि मेडिसिनची उपलब्धतेबाबत चर्चा झाली. मेडिकल आणि नर्सिंग कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांना कोविड ड्यूटी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे निर्णय घेण्यात आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात. तसेच, ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here