कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता 93% कमी

0
82

भारतात कोवीशील्ड लस ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या AZD-1222 फॉर्मूलेशनचा का मेड इन इंडिया प्रकार आहे. भारतात कोरोनाच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या लसींमध्ये सर्वाधिक प्रमाणात हीच लस वापरली जात आहे. कोरोनाची लागण लसीकरणानंतरही होत असल्यामुळे लोक चिंतीत आहेत.देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोवीशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला असल्याचे समोर आले आहे.

कोवीशील्ड लस घेतलेल्या व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाल्यानंतरच त्याला पूर्णपणे व्हॅक्सीनेटेड असे म्हटले जाते.कोरोना विरोधात लढण्याचा एकमेव शस्त्र लसीकरण आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. पण, यातून कोरोना होणारच नाही अशी गॅरंटी नाही. त्यामुळे, लसीकरण झाल्यानंतरही कोरोना काळातील निर्धारित नियमांचे पालन करा, सोशळ डिस्टन्सिंग ठेवा, मास्क लावा. कोरोनाच्या गंभीर परिणामांपासून लस आवश्य बचाव करत असते. त्यामुळे लस घ्या असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here