क्रूझ कारवाई: के.पी. गोसावी आणि मनिष भानुशाली एनसीबीचे अधिकारी ?-अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

0
89

मुंबईत एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले. 3 ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राईम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले.

एएनआयने दिल्लीच्या एनसीबीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले की, हा एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच या अधिकाऱ्याचा आणि एनसीबीचा काहीही संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जर तो व्यक्ती अधिकारी नाही तर आर्यन खानला कसा ओढून नेऊ शकतो? हे एनसीबीने स्पष्ट करावे असे मलिक यांनी म्हटलं आहे.

दुसरा आरोपी आरबाझ मर्चंटला एनसीबी मरुम शर्टमधील एनसीबी अधिकारी मनीष भानुशाली ओढत नेत आहे. हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसून तो भाजपचा नेता आहे. भानुशालीचे पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, यांच्यासोबत फोटो आहेत. याबाबतचेही स्पष्टीकरण एनसीबीला द्यावे लागेल असे मलिक म्हणाले.

सध्या के.पी.गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.क्रूझवर अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशीही भूमिका मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here