क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण: विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानची उच्च न्यायालयात धाव

0
87

आर्यन खानच्या वकिलांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.यासंदर्भात आज सुनावणी होणार की नाही याकडेच सर्वांच लक्ष लागून होते.पण आजही शाहरुखच्या पदरी निराशा आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानचे वकील अमित देसाई, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कोरोनाच्या नवीन नियमांनुसार, उच्च न्यायालयात दाखल करायची सर्व कागदपत्रे 24 तासांसाठी क्वारंटाइन कक्षात पाठवली जातात. त्यामुळे त्यांच्या अर्जावर आज नव्हे तर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

NCB हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले.आर्यन 8 ऑक्टोबरपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला तुरुंगात कैदी क्रमांक 956 चा बॅच मिळाला आहे. आर्यनची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही 21 ऑक्टोबरला संपत आहे.

आर्यन खूप प्रभावशाली व्यक्ती आहे आणि जर जामिनावर सुटला तर पुराव्यांशी छेडछाड करु शकतो किंवा कायद्यापासून पळवाट काढू शकतो. सिंग पुढे म्हणाले की, आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज यांना ठोस पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज रॅकेटचे परदेशी संबंध तपासले पाहिजेत. हे एक मोठे षड्यंत्र आहे ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे. आर्यन अरबाजकडून ड्रग्ज घेत असे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये. एनसीबीने न्यायालयात एक व्हॉट्सअॅप चॅट देखील सादर केला, आणि दावा केला की या चॅटच्या तपासात उघड झाले आहे की ड्रग्स प्रकरणात आर्यन खानची महत्वाची भूमिका आहे असे ने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here