क्रूझ ड्रग्ज प्रकरण: आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एक नवा ट्विस्ट

0
67

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सध्या जेलमध्ये आहेत. त्याची आणि त्याच्या साथीदारांची कसून चौकशी होत आहे. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन नाकारला आहे.तर दुसरीकडे याच प्रकरणामुळे राजकारणही होत आहे. जामीन नाकारल्यामुळे संशयाचे दात जाळे निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही याबद्दल तर्कवितर्क केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रभाकर सेलच्या आरोपांनंतर या छापेमारी संदर्भात आणि एनसीबी अधिकाऱ्यांसह केपी गोसावीच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. धक्कादायक म्हणजे 18 कोटींवर ही डील सुद्धा झाली आहे असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांने केला आहे.

केपी गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांचा फोटो आर्यन खानसोबत समोर आला आहे.केपी गोसावीला मी 25 कोटी रुपयांबद्दल बोलतांना ऐकले आहे. मात्र ही डील 18 कोटी रुपयांमध्ये झाली होती. त्यातले 8 कोटी रुपये एका एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे होते. असा धक्कादायक खुलासा प्रभाकर साईलने केला आहे.केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे.

ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असं त्याने सांगितलं. क्रूझवर छापेमारीच्या वेळी आपण काही व्हिडिओ आणि फोटो काढले होते, असंही प्रभाकरने सांगितलं. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये गोसावी आर्यन खानला फोनवर कोणाशी तरी बोलायला लावताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here