क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या गौप्यस्फोटाची मालिका अजून सुरूच आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा बॉम्ब फोडला आहे. नवे पुरावे पुन्हा एकदा उघड केले आहेत. नवाब मलिक यांनी आज ट्वीट करत NCB च्या कारवाईवर पुन्हा उपस्थित केला प्रश्न आहे. नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे यामध्ये दिसत असलेल्या व्हाट्स अँप चाट प्रसिद्ध करून नवाब मलिक यांनी काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.