मुंबई सत्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी शनिवारी विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल केला होता.आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ड्रग्ज प्रकरणात आर्थर जेलमध्ये आहे.एनसीबीला आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. तर दुसरीकडे मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या शूजमध्ये चरस लपवल्याची माहिती समोर आली होती.
आर्यनची बाजू मांडण्यासाठी सलमान खानचे वकील अमित देसाई न्यायालयात आले होते. या प्रकरणात आर्यन एकमेव अशी व्यक्ती आहे, जिच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळालेले नाही असा युक्तिवाद वकील अमित देसाई यांनी केल्यानंतर एनसीबीने न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने गोरेगाव येथून आणखी एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. नायजेरियाचा नागरिक असलेल्या ओकारो औजामा या परदेशी नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त केले आहे. एनसीबीच्या मते, हा परदेशी नागरिक ड्रग्ज प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासह, क्रूझ ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आले असल्याचे एनसीबीने सांगितले.
आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि अन्य एक व्यक्ती आर्यनचा बंगला मन्नत येथून एकत्र मर्सिडीज कारमधून निघाले होते. हे सर्व लोक एकत्र क्रूझ पार्टीसाठी बाहेर गेले होते असे शाहरुखच्या ड्रायव्हरने एनसीबीला सांगितले आहे. क्रूझ पार्टीच्या काही दिवस आधी, ड्रग्जबद्दल संभाषणाचे पुरावे एनसीबीला मिळाले आहेत.