क्रूझ ड्रग्स प्रकरण:अनन्या पांडेची कसून चौकशी

0
73

क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आर्यन,अरबाज आणि मुंनमुंन यांना कोठडीत पाठवल्यानंतर आणखी एक नवोदित अभिनेत्री या प्रकरणात आहे असे सांगितले. आजपर्यंत त्यांनी हि अभिनेत्री हि अभिनेत्री कोण हे सांगितले नव्हते. याचे पुरावे त्यांना आर्यनच्या फोनमध्ये चॅटिंगच्या स्वरूपात मिळाले होते. त्यामुळे एनसीबीने गुरुवारी शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्या घरांवर छापा टाकला. एनसीबीने अनन्याला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. दुपारी ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर अनन्या संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास एनसीबीच्या ऑफिसमधून बाहेर पडली. उद्या पुन्हा एकदा अनन्याला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

आजच्या चौकशीतून ​आणखी काही अभिनेत्यांच्या मुलांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.अनन्यासह तिचे वडील चंकी पांडे आणि वकील हजर होते. आज सकाळी एनसीबीचे पथक बांद्राच्या अनन्याच्या घरी दाखल झाले होते एनसीबीने अनन्याचा फोन जप्त केला होता. या चौकशीतील अनन्याचा जबाब आर्यनच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण एनसीबीच्या हाती आर्यन आणि अऩन्या यांचे जे व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळाले आहेत, ते सर्वसामान्य नसून त्यात ड्रग्जची खरेदी आणि त्याच्या सेवनाबद्दलचा उल्लेख असल्याचा दावा केला आहे.

मंगळवारीदेखील आर्यनला जामीन मिळू नये अशा प्रयत्नात एनसीबी आहे.दरम्यान एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. मात्र, याचा मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जाच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही. आर्यनची न्यायालयीन कोठडी 21 ऑक्टोबरपर्यंत होती, त्यानंतर एनसीबीने न्यायालयात मुदतवाढ मागितली होती.

आर्यनला जर आता जमीन मिळाला नाही तर मात्र येणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे त्याचा तुरुंगवास १४ नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची श्यक्यता आहे. आज १५ दिवसांनंतर शाहरुख खान आर्यंलं भेटण्यासाटी गेला होता. तेव्हा तो खुप रडत होता असे सूत्रांकडून समजते आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here