प्रतिनिधी- अभिमन्यु वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग- वेंगुर्ले- खवणे येथीलआकाश फिश मिल मधील परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील मुलींचा पाठलाग करून छेड काढल्याचा प्रकार घडला. सदर घडलेला प्रकार तेथील नागरीकांना समजताच संतप्त लोकांनी फिश मिल परिसरात येऊन मुलींच्या हस्ते छेड काढणाऱ्या त्या तीन परप्रांतीय कामगारांना चपलेचा प्रसाद दिला.
ही घटना निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्या परप्रांतीयांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला की नाही हे अद्याप समजलेले नाही.तसेच आकाश फिश मिलच्या चिमणीतून आकाशात सोडला जाणारा दुर्गंधीजन्य धुर व सांडपाणी यामुळे नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच परप्रांतीय कामगारांनी काढलेली मुलीची छेड या प्रकारामुळे आकाश फीशरीच्या व्यवस्थापनाच्या डोकेदुखीत अधिक वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.