काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. त्यांना शनिवारी ता. १५ पहाटे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातच जहाँगिर हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून तज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन असल्याचे सुत्रांनी सांगितले.मुंबईल येथील डॉ. राहुल पंडीत, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुुधारणा झाली होती. त्यामुळे चोविस तासा पैकी काही तासच त्यांना व्हेंटीलेंटरवर ठेवले जात होते.तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली आहे. खासदार ॲड. सातव यांच्या आई तथा माजीमंत्री रजनी सातव आज दुपारीच पुणे येथे पोहोचल्या आहेत.