‘गजर तुझा मोरया’ रोहित राऊतचे नवे गाणे लाँच

0
67

नादखुळा म्युझिक लेबल यांच्या ‘आपली यारी’ गाण्याला मिळालेल्या अफाट यशानंतर आता ‘गजर तुझा मोरया’ हे नवं सुमधूर गाणं घेऊन आले आहेत.सचिन कांबळे दिग्दर्शित ‘गजर तुझा मोरया’ हे गाणं नुकतंच लाँच झाले आहे. कुणाल करण लिखित हे गीत असून त्याचे संगीत दिग्दर्शन कुणाल करण यांनीच केले आहे. तर रोहित राऊतने हे गाणे गायले आहे.

दिग्दर्शक सचिन कांबळे म्हणतात,”महापूरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधीक कथा गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात गणेश आराधनेत ऐकलं जाईल, अशी आशा आहे.”

कुणाल-करण यांनी, ”आमचं घर कोकणात असल्याने यंदा कोकणासह महाराष्ट्राला पावसाने जे झोडपलंय त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे ह्या गाण्याचे बोल आणि स्वरसाज हृदयातून उमटलेला आहे. रोहितने गायलेले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असं मला वाटतं.”असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here