गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरु होणार-आमदार वैभव नाईक

0
127
आमदार वैभव नाईक
आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची आज मुंबई येथे भेट घेऊन गणेशोत्सवाच्या(Ganesh festival) पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एसटी (ST Bus)बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी केली त्यानुसार १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत सिंधुदुर्ग(Sindhudurg) जिल्ह्यातील सर्व एसटी बस फेऱ्या सुरळीत सुरु करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यातील एसटी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

परंतु गणेशोत्सव सणानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व एसटी बस फेऱ्या सुरळीत सुरु करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली. आ. वैभव नाईक यांची मागणी तात्काळ मान्य करण्यात आली असून १ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एसटी बसफेऱ्या सुरळीत सुरु करण्यात येणार आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here