‘गाथा नवनाथांची’ मालिकेचे शीर्षक गीत कैलाश खेर यांच्या आवाजात

0
85

सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे.कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.’गाथा नवनाथांची’ आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत.या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे. 

‘गाथा नवनाथांची’ हे या मालिकेचे नाव असून येत्या 21 जूनपासून, सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडे सहा वाजता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here