गुहागरच्या समुद्रात बुडून ‘त्या’ दोघा तरुणांचा मृत्यू

0
70

गुहागर : – पाचमाड येथील खडकाळ परिसरात मासे मारताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला. आरे गाव (ता. गुहागर) येथील सिद्धांत संदेश साटले (वय २३) आणि प्रतीक किसन नावले (वय २५ ) अशी मरण पावलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. सिद्धांत साटले आणि प्रतीक नावले हे दोघेही गेले काही दिवस मासेमारीसाठी जात होते. दि. २१ जून मासे पकडण्यासाठी ते गेले असता ते सायंकाळपर्यंत परत आले नाहीत, म्हणून दोघांचे मित्र त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले.

बाग परिसरातील पाचमाड समुद्रकिनारी सुरूच्या झाडाखाली दुचाकी उभी करून ते दोघे खडकात गेले होते. जाताना आपले मोबाइल दुचाकीमध्ये ठेवून गेले होते. शोध घेणारी मंडळी सोमवार सायंकाळी खडकापर्यंत जाऊन परतली. भरतीच्या वेळी ते दोघे जिवंत सापडतील, अशी आशा होती. म्हणून रात्री साडेबारा वाजेपर्यंत शोध सुरू होता. पण त्याला यश आले नाही. पुन्हा मंगळवारी पहाटे ५ वाजता शोधमोहिमेला सुरवात झाली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास गुहागर वरचापाट मोहल्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर सिद्धांतचा मृतदेह सापडला, तर त्याच दरम्यान गुहागर बाजारपेठ परिसरात प्रतीकचा मृतदेह सापडला. दोघांच्या डोक्याला तसेच शरीरावर जखमा होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here