गृहमंत्री अमित शहांना एकट्यात भेटले शरद पवार!

0
78

शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सुमारे 15 मिनिटे भेट घेतली.त्याआधी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटींमुळे महाराष्ट्रात अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.चे हे दोन पदाधिकारी प्रकाश नाईकनवरे आणि जयप्रकाश दांडेगावकर देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हेही बैठकीत पवारांसोबत होते. शरद पवारांच्या भेटीचे कारण सांगताना ही बैठक राजकीय नसून कामाच्या मुद्द्यांची बैठक असल्याचे सांगितले असून या बैठकीत महाडमध्ये पूर दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ कॅम्प असावा आणि इतर काही मागण्यांसाठी शहा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे .

सध्या चाललेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची सखोल चौकशी, तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराचा मद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अटकेसाठी चाललेले प्रयत्न,नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयालाही ईडीने अटक केली आहे. यामुळेच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आसा राजकीय अर्थ महाराष्ट्रात काढला जात आहे.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय संबंध सुधारताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here