गोवा:वास्को येथील महालक्ष्मी मूर्तीच्या दागिन्यांची चोरी

0
193
पोस्ट ऑफिस वेंगुर्ला नजीकच्या शिरोडकर आंबा बागेत त्रिफळांची चोरी

गोवा: खरियावाडा, वास्को येथील समिती मंडळ येथे महालक्ष्मीला पूजेसाठी देवीला सजविण्यात आले होते.यासाठी सोन्याच्या दागिन्यांनी देवीला सजविले होते.हे दागिने कुण्या अज्ञाताने चोरून नेल्याचे निदेर्शनास आले आहे.या चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

समिती मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले कि ,गेले ६६ वर्ष अशा पद्धतीने देवीची पूजा केली जात आहे. यासाठी पोलिसांचा पुरा बंदोबस्त असतो.त्याशिवाय सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कॅमेरेही बसविण्यात आले आहेत


शनिवारी सकाळी देवीच्या पूजेदरम्यान पुजाऱ्याला देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हार नसल्याचे निदर्शनात आले. त्यांनतर त्याने हे सर्व समितीच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आणले. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत असून कॅमेऱ्याच्या फुटेजचेही निरीक्षण करत आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here